मी नाडी धरून जप केला तर रुग्ण बरे होतात ; प्रमोद महाजन यांना समक्ष भेटता न आल्याने झालो फेल ; शिवसेनेच्या खासदार चंद्रकांत खैरे यांचे आरोग्य मेळाव्यात धक्कादायक वक्तव्य

Foto
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे त्यांच्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत राहतात आज खासदार खैरे हे चक्क चमत्कारिक बाबा बनले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित आरोग्य मेळाव्यात बोलताना त्यांनी मी रुग्णाची नाडी धरून जप केला तर रुग्ण बरे होतात. दिवंगत प्रमोद महाजन यांना रुग्णालयात समक्ष भेटता न आल्याने मी जीवनात एकदाच फेल झालो. असे वक्तव्य केल्याने पुन्हा नवीन वाद उफाळला आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील खडकेश्वर भागात मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थनी असलेल्या खैरे यांनी त्यांच्या भाषणात आरोग्याबाबत अनेक उपदेश रुग्णांना दिले. दरम्यान मंचावर शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर  यांना उद्देशून त्यांनी माझ्या कडे डॉक्टरची डिग्री नाही. मी अनेक लोकांना बरे केले आहे. मी नाडी ला हात लावून जप केला तर संध्याकाळ पर्यंत मृत्यू होईल असे डॉक्टरांनी घोषित केलेले रुग्ण बरे केलेले आहे.

प्रमोद महाजन रुग्णालयात असताना मला भाजप चे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही तरी करा असे म्हंटले होते.मी बाबा नि दिलेली एक  पुडी त्यांच्या उशी खाली ठेवायला सांगितली होती.मी त्यांची नाडी धरून  जप म्हणू शकलो नाही.त्यामुळे मी फेल झालो असे खा. खैरे म्हणाले

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker